सुभाष वारे - लेख सूची

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली तरुणाई 

डिसेंबर २०२२ पासून जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची म्हणजेच एआयची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. त्याला कारण आहे कृत्रिमप्रज्ञेचा नवा अवतार. यंत्रमानव हा तसा जुना प्रकार आहे. त्यावर अनेक चित्रपटही आले. मायक्रो चिपमधील प्रोग्रामिंगनुसार आधीच देऊन ठेवलेल्या सूचनांप्रमाणे ठरलेली कामे करणारा यंत्रमानव आपण पाहिलेला आहे. पण प्रोग्रामिंगमध्ये दिलेल्या सूचनांपेक्षा वेगळी परिस्थिती उद्भवली तर …